बातम्या
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका,संप मिटावा पालकांची मागणी
By nisha patil - 12/27/2023 5:09:07 PM
Share This News:
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका,संप मिटावा पालकांची मागणी
कोल्हापूर - शासन दरबारी प्रलंबित विविध असलेल्या मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दि. ४ डिसेंबर पासून संप पुकारला आहे. त्यामुळे अंगणवाड्यांना लावलेले कुलूप अजूनही कायम आहे. मदतनीसांनी मानधन वाढीसह अन्य मागण्यांसाठी पुकारलेला संप तेवीसाव्या दिवशीही सुरूच आहे .परिणामी या संपामुळे पन्हाळा तालुक्यातील ३४७ अंगणवाडयातील ३ ते ६ वयोगटातील ४८७४ बालकांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे. पोषण आहार वेळेत न मिळाल्यास कुपोषणाची भीती व्यक्त होत आहे.
पन्हाळा तालुक्यात ३४७ अंगणवाड्या असून ३०१ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. ४२ मिनी सेविका तर ३०४ मदतनिस काम करत आहेत. अंगणवाडी सेविकांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे अंगणवाड्या विद्यार्थी अभावी ओस पडल्या आहेत. पोषण आहारासाठी मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने आहार स्वखर्चातून खरेदी करावा लागतो. चार- पाच महिन्यांपर्यंत अनुदानाची वाट पाहावी लागत आहे.बालकांना रोज मिळणारा पोषण आहार मिळणे बंद झाला आहे. बालकांना पोषण आहार सोबतच अंगणवाडीत मनोरंजनात्मक विविध कार्यक्रम घेतले जातात. मात्र अंगणवाडी केंद्रे बंद आहेत. मित्र परिवार भेटत नाहीत यामुळे चिमुकल्यांचा हिरमोड झाला आहे.
' मम्मी पप्पा मला शाळेत जायचं आहे ' असे बोबडे बोल पालकांना ऐकायला मिळत आहेत. अंगणवाडी सेविका वर्षांनुवर्षे तटपुंज्या मानधनावर कर्तव्य बजावत आहेत. त्यांना वेळेवर मानधन मिळत नाही. दरम्यान बतालुक्यातील ० ते ३ वर्ष वयोगटातील ६४६८ बालके ,९६८ गरोदर माता १२२१ स्तनदा माता"
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका,संप मिटावा पालकांची मागणी
|