बातम्या
अंगणवाडी सेवीका व मदतनीसांचे आजपासून मुंबईत आमरण उपोषण.
By nisha patil - 9/23/2024 6:57:52 PM
Share This News:
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनवाढीचा शासकिय अध्यादेश तात्काळ काढा, सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार तत्काळ ग्रँचूईटी तत्काळ लागू करा, सेविका व मदतनीस याना दरमहा पेन्शन लागू करा या व इतर मागणयासाठी सोमवार पासून राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे
आजपासून २३ सप्टेंबर पासून कृती समितीचे पदाधिकारी व राज्यपातळीवरील प्रमुख पदाधिकारी आमरण उपोषणास बसणार आहेत.
त्यानंतर शासनांने दखल न घेतल्यास बुधवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी एक दिवसशाळा बंद ठेवून मुंबईत जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे
शासनाने अंगणवाडी सेविकांच्या ४ डिसेंबर ते २५ जानेवारी पर्यंतच्या ५२ दिवसाचा संप करुन देखील मागण्या मान्य केल्या नाहीत त्यामुळे सेविका व मदतनीस यांच्यात तीव्र स्वरूपाचा असंतोष आहे.
या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील सेविका व मदतनीस यांनी मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन चे अध्यक्ष कॉम्रेड आप्पा पाटील व सरचिटणीस कॉम्रेड जयश्री पाटील यांनी केले आहे
अंगणवाडी सेवीका व मदतनीसांचे आजपासून मुंबईत आमरण उपोषण.
|