बातम्या

आंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : पोलिसांनी सेविकांना पकडून नेले

Anganwadi workers march on the collectors office


By nisha patil - 12/27/2023 5:08:02 PM
Share This News:



आंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा : पोलिसांनी सेविकांना पकडून नेले

कोल्हापूर - आंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या शासनाकडे  प्रलंबित होत्या, या मागण्या मान्य न झाल्याने गेल्या २५ दिवसापासून आंदोलन सुरू करुन,शाळा बंद करुन उपोषण करण्यात आले.  मंत्री आदिती तटकरे यांनी सेविकांना चर्चेसाठी बोलवून घेतले पण त्या स्वतः न येता काँन्फरन्स वरती चर्चा केली. तसेच नागपूर आधिवेशनात मंत्री गिरीश महाजन यांनी आम्ही आंगणवाडी सेविकांना आदींच पगारवाढ केली आहे, सध्या करणार नाही. या रागाने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जलभरो आंदोलन केले. यावेळी आपा पाटील यांच्या सह आंगणवाडी सेविकांना पकडून पोलीस गाडीतून नेण्यात आले.यावेळी आपा पाटील यांच्या सह सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


आंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : पोलिसांनी सेविकांना पकडून नेले