बातम्या

अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच राहणार

Anganwadi workers strike will continue


By nisha patil - 12/19/2023 5:01:27 PM
Share This News:



अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच राहणार 

कोल्हापूर :  अंगणवाडी संपात तोडगा काढण्यासाठी मंत्र्यांनी कोणताही प्रयत्न केला नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षांची आहे. जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहील अशी घोषणा जिल्हा अंगणवाडी कार्य कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी केली.
   

दोन आठवड्यांपासून सुरू असणारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजही  सुरू आहे. संघटनेने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्र प्रसिद्ध केले आहे त्यातील माहितीनुसार सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी चार वर्षांपासून आंदोलन सुरू केले आहे. महागाई ३२०० रुपयांनी वाढल. मात्र मंत्री पंधराशे रुपयांवर आडून बसले आहेत. संघटनेने दिलेला पत्राचा बोध मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतला नाही. त्यामुळें राज्यभरातील अंगणवाडी सेविकांमध्ये याबाबत असंतोष पसरला आहे.
 

अंगणवाडी संप सुरू झाल्यानंतर आहार वाटण्याचे नियोजन सांगणारे आयुक्तांचे परिपत्रक धोरणाचे निदर्शक आहे. ते भ्रष्टाचाराला खत पाणी घालणारे आहे त्यामुळे जोपर्यंत अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे असे पत्रकार म्हणले आहे


अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच राहणार