बातम्या

अंगणवाडी कर्मचारी संघ मंगळवारी कोल्हापूर महामार्ग रोखणार ; अंगणवाडी कर्मचारी बेमुदत चिघळण्याची शक्यता

Anganwadi workers union to block Kolhapur highway on Tuesday


By nisha patil - 1/19/2024 12:43:32 PM
Share This News:



अंगणवाडी कर्मचारी संघ मंगळवारी कोल्हापूर महामार्ग रोखणार ; अंगणवाडी कर्मचारी बेमुदत चिघळण्याची शक्यता

कोल्हापूर : मानधन वाढीसह अन्य मागण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर शासनाने संपाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
 

अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने संपाची तीव्रता वाढविण्यात येणार असून  24 जानेवारीला मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. गुरुवारी संपाचा 46 वा दिवस होता. अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी चार डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे. 46 व्या दिवशी देखील संप सुरूच राहिला. कर्मचारी संघाने अध्यक्ष अतुल दिघे व सचिव सुवर्णा तळेकर यांनी मंगळवारी महामार्ग रोखण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार द्वारे दिली आहे. 22 जानेवारी पर्यंत मंत्रिमंडळाने भरीव निधी पेन्शन ग्रॅज्युएटीच्या निर्णयाबाबत कृती समितीला लेखी काहीच कळविले नाही.
 

अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक क्रिया करण्यात येणार असल्याचे आयटक सलग्न महाराष्ट्र राज्य बालवाडी ,अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष सतीश चंद्र कांबळे व सचिव शुभांगी पाटील यांनी सांगितले. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुंबई संयुक्त बैठक बोलाविण्याबाबत आश्वासन दिले होते परंतु अद्याप त्याबाबत काहीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही


अंगणवाडी कर्मचारी संघ मंगळवारी कोल्हापूर महामार्ग रोखणार ; अंगणवाडी कर्मचारी बेमुदत चिघळण्याची शक्यता