बातम्या

अवेळी पाण्यामुळे नागरिकांकडून संताप

Anger from citizens due to unseasonal water


By nisha patil - 1/4/2024 12:13:59 PM
Share This News:



तीन महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने मोरेवाडी येथील भारतीनगर मधील महिलांनी पालथ्या घागरी ठेवून जीवन प्राधिकरणाचा निषेध नोंदवला आहे  परिसरात अनेक कुटुंबातील सदस्य नोकरी करतात. पाणी अवेळी येत असल्याने  त्यांना पाण्यासाठी वेळ काढून घरी थांबावे लागते. अथवा चावी खाली मोठा पीप लावून शेजाऱ्यांना सांगावे लागते.

परिसरातील अनेक कुटुंबातील नागरिक नोकरी करत असतात त्यामुळे पाण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत करावी लागत , अशी स्थिती गेल्या तीन महिन्यांपासून आहे. पाणी आले तरी मध्यरात्री व अवेळी येत असल्याने संपूर्ण दिवस पाण्याची वाट बघत घालवावा लागतो. यामुळे परिसरातील महिलावर्गाकडून अक्षरशः नाराजी व्यक्त केली जात आहे. 
 

या  आंदोलनात सीमा पाटील, मंगल बागडी, रूपाली माने, स्नेहल पाटील,मानसी खोत, सप्तशृंगी कुंभार, रुक्मिणी बडकस, प्रेम पालाडिया, सुमन कारंडे, उज्ज्वला क्षीरसागर, सीमा बंडगर, सीमा चिवलकर, वंदना कुंभार यांच्यासहमैत्रीण महिला मंडळाच्या सदस्या हरिष कारंडे, सीताराम शिंदे, युवराज कदम यांनी भाग घेतला होता


अवेळी पाण्यामुळे नागरिकांकडून संताप