बातम्या

अ‍ॅनिमल' रिलीज होताच 'या' वेबसाईटवर लीक

Animal was leaked on Ya website as soon as it was released


By nisha patil - 1/12/2023 3:53:24 PM
Share This News:



बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'अॅनिमल'  हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा हा सिनेमा अखेर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण रिलीज होताच हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे.  ऑनलाईन लीक झाल्यामुळे रणवीर कपूर आणि निर्माताना मोठा फटका बसला आहे. 
 

रणबीर कपूर रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल यांच्या 'अॅनिमल' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 1 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रदूषित झाला. संदीप रेड्डी वांगा यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रणबीरचा 'अॅनिमल' सुपरहिट होणार असल्याचं म्हटलं जात होतं. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही या सिनेमाने धमाकेदार कामगिरी केली. परंतु सिनेमा ऑनलाईन लिक झाल्यामुळे  कोठेवाडी रुपयांचं मोठ नुकसान झालं आहे
   

सिनेमागृहात सिनेमा प्रदर्शित झाला की तो ऑनलाईन लीक होण्याचं चित्र काही नवं नाही. 'जवान' 'पठाण'  आणि 'टायगर 3'नंतर  रणबीरचा 'अॅनिमल' हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. 
    मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर-रश्मिकाचा 'अॅनिमल' हा सिनेमा फिल्मीवैप , तामिळ रॉकर्स आणि फिल्मीजिला  या साईट्सवर लीक झाला आहे. या सर्व साईट्सवर हा सिनेमा HD क्वालिटीमध्ये लीक झाला आहे.  सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने सिनेमाच्या कमाईवर आणखी  याचा परिणाम होणार आहे.


अ‍ॅनिमल' रिलीज होताच 'या' वेबसाईटवर लीक