बातम्या

अनिशच्या मृत्यूने आमच्या पायांखालची जमीनच सरकली

Anishs death shook the ground under our feet


By nisha patil - 5/22/2024 5:03:37 PM
Share This News:



पुणे : प्रतिनिधी अनिशच्या मृत्यूची बातमी आली, आमच्या पायांखालची जमीनच सरकली. अनिश माझ्यासाठी, त्याच्या लहान भावासाठी पूर्ण कुटुंबासाठी आधारस्तंभासारखा होता. त्याला का मारलं? मला माझा मुलगा परत द्या” म्हणत अनिषच्या आईने हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला.


अनिशच्या वडिलांनी काय म्हटलं आहे? अनिशचे वडील म्हणाले, “अनिश पुण्यातल्या एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होता. अपघाताच्या आधीच तो दुबईला जाऊन आला होता. तसंच त्याची कंपनी त्याला विदेशात पाठवणार होती. त्याचं ते स्वप्न होतं. मात्र त्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. अनिशच्या ऑफिसला सुटी असल्याने पार्टीसाठी गेला होता. रात्री २ ते ३ च्या सुमारास तो पार्टीवरुन घरी परतत होता. त्याचवेळी त्याचा अपघात झाला.त्याच्या मित्रांनी त्याच्या आईच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी आम्हाला घटनेची माहिती मिळाली. अनिश विदेशात जाण्याचं स्वप्न पाहात होता. आमच्या कुटुंबाचा आधार गेला. आमच्या मुलांना त्रास झाला.”


अनिशच्या मृत्यूने आमच्या पायांखालची जमीनच सरकली