बातम्या
अंजू तुरंबेकर यांना ए एफ सी अवार्ड ज्युरी मेंबर चा बहुमान
By nisha patil - 3/11/2023 8:20:31 PM
Share This News:
अंजू तुरंबेकर यांना ए एफ सी अवार्ड ज्युरी मेंबर चा बहुमान
दि. 31ऑक्टोबर 2023 रोजी दोहा (कतार) येथे ए एफ सी अॅन्युअल अवॉर्ड 2022 मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये कोल्हापूरची कन्या कु. अंजू तुरंबेकर यांच्यावर काही श्रेणींमधील अवाॅर्ड विजेता निवडण्याची जबाबदारी सोपविली होती. या अवार्ड निवडीकरीता ज्युरी सदस्य म्हणून भारतातील केवळ महिला कु अंजू तुरंबेकर यांना हा बहुमान मिळाला त्यांच्याबरोबरच आशियातील फुटबॉल क्षेत्रातील इतर दिग्गज व्यक्तींचा देखील समावेश होता.
या पार पडलेल्या समारंभामध्ये आशियातील खेळाडू, प्रशिक्षक, सदस्य संघटना यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अवाॅर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. ज्यामध्ये ए एफ सी प्लेयर ऑफ द इयर आणि ए एफ सी महिला खेळाडूंचा देखील समावेश आहे.
अंजू तुरंबेकर या भारतातील पहिल्या महिला ए एफ सी पॅनल सदस्या आणि तांत्रिक तज्ञ म्हणून 2019 पासून कार्य करत आहेत. आजपर्यंत त्यांनी आशिया खंडातील ऑस्ट्रेलिया, नेपाल, भूतान, उजबेकिस्तान, कोरिया, फिलिपीन्स, ताजिकिस्तान अशा अनेक देशांसोबत फुटबॉल या खेळाचा दर्जा उंचविण्यासाठी कार्य केले आहे.
तुरंबेकर यांनी भारत देश तसेच इतर आशियाई देशांचा ग्रासरूट फुटबॉल
विकसित करण्यासाठी मोलाचा हातभार लावला आहे. त्यांनी भारत देशाच्या ग्रासरूट डेवलपमेंट हेड आणि इंस्ट्रक्टर म्हणून जवळजवळ 7 वर्षे कार्य पाहिले आहे. सध्या ए एफ सी ने त्यांची उजबेकिस्तान या देशासोबत कार्य करण्यासाठी नियुक्ती केली आहे. यासाठी त्यांचा 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत उजबेकिस्तानला दौरा देखील होणार आहे.
अंजू तुरंबेकर यांना ए एफ सी अवार्ड ज्युरी मेंबर चा बहुमान
|