बातम्या
पाकिस्तानात आणि नसरुल्लाहच्या गावात भारतातील अंजूचे जोरदार स्वागत
By nisha patil - 7/25/2023 6:49:04 PM
Share This News:
अंजू आणि माझा येत्या काही दिवसांत साखरपुडा होईल. त्यानंतर दहा-बारा दिवसांनी अंजू भारतात परतेल. त्यानंतर लग्नासाठी पुन्हा पाकिस्तानात येईल. हे माझे आणि अंजूचं वैयक्तिक आयुष्य आहे. त्यात कोणीही हस्तक्षेप करू नये, असे आम्हाला वाटतं. आम्ही माध्यमांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहोत.”
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा राज्यातील दीर बाला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय नसरुल्लाहचे हे म्हणणे आहे. नसरुल्लाह काही वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील उत्तर प्रदेशमधील अंजू या महिलेच्या संपर्कात आला. कालांतराने दोघांच्या ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं.
हे नातं इतकं घट्ट झालं की, नसरुल्लाहला आयुष्याचा जोडीदार बनवण्यासाठी अंजूनं पाकिस्तान गाठलं.
सध्या अंजू पाकिस्तानातील दीर बाला येथील नसरुल्लाच्या घरी पोहोचलीय. दीर बालाचे जिल्हा पोलीस अधिकारी मोहम्मद मुश्ताक यांनी अंजू पाकिस्तानात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
हे प्रकरणं पाकिस्तानातील सीमा हैदर आणि नोएडास्थित सचिन मीणा यांच्या प्रेमकथेसारखंच आहे. सीमा आणि सचिन यांचं हे प्रकरण सध्या भारत आणि पाकिस्तानात गाजतंय.
अंजू व्हिसा घेऊन कायदेशीररित्या पाकिस्तानात आली असली तरी दोघांना व्हिसासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागली होती.पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर गेल्या आठवड्यात चार मुलांसह अवैधरित्या भारतात पोहोचली. PUBG मोबाईल गेम खेळत असताना सीमा हैदरची सचिन मीणाशी ओळख झाली. ही ओळख प्रेमात रुपांतरित झाली.
पाकिस्तान आणि भारतातील नागरिकांमधील अशा प्रेमकथा नवीन नाहीत, परंतु दोन्ही देशांमधील ताणलेल्या संबंधांमुळे आता दोन्ही देश एकमेकांच्या नागरिकांना किमान व्हिसा देतात.
पाकिस्तानात आणि नसरुल्लाहच्या गावात भारतातील अंजूचे जोरदार स्वागत
|