बातम्या
समाजकल्याणमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 103 वी जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन
By nisha patil - 1/8/2023 7:35:57 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. 1 : रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे अण्णा भाऊ साठे हे प्रथम लोकशाहीर होते. ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव’ हे त्यांचे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले. ‘फकीरा’ या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. त्यांनी 35 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्य आणि 19 पोवाडे रचले आहेत. चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या सर्व प्रवासामध्ये अण्णांनी श्रमिक, कष्ठकरी लोकांची भूमिका त्यांच्या कथा, कादंबऱ्यामध्ये प्रभावी लेखन करून समाजापुढे मांडली असून समाजाच्या विकासामध्ये श्रमिक, कष्ठकरी घटकांचा खूप मोठा असल्याचे मत प्रा. प्रभाकर निसर्गंध, विजयसिंह यादव, कला व विज्ञान महाविद्यालय पेठ वडगाव यांनी मांडले. ते सहायक आयुक्त, समाजकल्याण कोल्हापूर येथे आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित जाहीर व्याख्यानात बोलत होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल त्यांनी उपस्थितांना माहिती दिल. त्यांचा जन्म 01 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, पटकथा, लावणी यांची निर्मिती केली. त्यांची ‘मुंबईची लावणी’ व ‘माझी मैना गावावर राहिली’ या लावण्या अविस्मरणीय आहेत असे ते पुढे म्हणाले.
आजच्या अण्णा भाऊ साठे यांचे जयंतीनिमित आयोजित कार्यक्रमास शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना निमंत्रित केले असलेचे प्रतिपादन आपल्या प्रस्ताविकेमधून विशाल लोंढे, सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी केले.
सामाजिक न्याय विभाग आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारेमाळ, कोल्हापूर या ठिकाणी सुरेश जाधव, अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. सुरेश जाधव यांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये उत्तीर्ण झालेले निहाल कोरे, यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार व स्पर्धा-परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तालुका समन्वयक सचिन परब यांनी केले तर आभार सचिन कांबळे, तालुका समन्वयक यांनी मांडले. कार्यक्रमासाठी उमेश घुले, उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर, सचिन पाटील, कार्यालय अधीक्षक, विशाल पवार, तसेच बी.सी.खाडे शिक्षण शास्त्र महाविद्यालय, महिला शिक्षण शास्त्र महिला महाविद्यालय मार्केट यार्ड कोल्हापूर कडील विद्यार्थिनी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील कर्मचारी अधिकारी वर्ग उपस्थित होते.
समाजकल्याणमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 103 वी जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन
|