बातम्या

इचलकरंजी शहरातील अण्णा रामगोंडा भाजी मार्केटला भाजी मंडईला भीषण आग

Anna Ramgonda vegetable market in Ichalkaranji town was gutted by fire


By nisha patil - 11/8/2023 4:06:22 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी(विनोद शिंगे) इचलकरंजी शहरातील अण्णा रामगोंडा भाजी मार्केटला भाजी मंडईला भीषण आग लागली असुन चार ते पाच भाजी विक्री त्यांचे मोठे नुकसान पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किट आग लागल्यामुळे झाले आहे. मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे साहेब यांनी मार्केट स्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले.

यावेळी वडगाव बाजार समितीचे संचालक सागर मुसळे, भाजीपाला संघटनेचे उपाध्यक्ष अमर सडगर, शिवाजी शिंदे, श्रीकांत टेके, राहुल घाट, कपिल शेटके, बजरंग डोईफुडे, अशोक गदगे, संतोष शिंदे, पांडुरंग स्वामी, राजू वडेकर यांच्यासह व्यापारी शेतकरी उपस्थित होते.


इचलकरंजी शहरातील अण्णा रामगोंडा भाजी मार्केटला भाजी मंडईला भीषण आग