बातम्या
शहाजी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न
By nisha patil - 3/19/2024 5:17:14 PM
Share This News:
कोल्हापूर: सध्याचा काळ खूप प्रतिकूल आणि वाईट आहे, यामध्ये हवेचे,ध्वनीचे, पाण्याचे प्रदूषण तर आहेच, परंतु त्याहीपेक्षा जास्त प्रदूषण विचारांचे होत आहे. तरुणांचा मेंदू बधिर करण्याचे काम सध्या सुरू आहे, तरुणांनो, विद्यार्थ्यांनो विचाराचे प्रदूषण रोखा आणि महापुरुषांनी, समाजसुधारकांनी सांगितलेल्या वाटेने चला असे आवाहन जेष्ठ विचारवंत, प्राचार्य डॉ. जे.के.पवार यांनी केले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील ऊर्जा पारितोषिक वितरण समारंभ आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के.शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीस स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
प्राचार्य डॉ. जे. के.पवार म्हणाले, घरातून बाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्यांना दोन वाटा दिसतील. एक वाट बिघडवणारी असेल तर एक वाट जीवण घडवणारी असेल. विचाराचे वाढलेले प्रदूषण ही तुमची वाट बिघडवेल. तुमचे जीवन घडवण्यासाठी चांगली वाट तुम्हाला साथ देईल.घराच्या आत जात, धर्म, पंथ असू द्या. घराच्या बाहेर पडल्यानंतर तुम्ही भारतीय आहात हे ओळखा. तुम्ही स्वतःचा, कुटुंबियांचा आणि देशाचा विचार करा आणि त्यानुसार वागा. महापुरुषांचे, समाज सुधारकांचे विचार तुम्हाला यासाठी मार्गदर्शन करतील. पदवी बरोबरच कौशल्य आधारित शिक्षण हे तुम्हाला स्वालंबी जीवनासाठी मदत करेल.
ते म्हणाले, शहाजी महाविद्यालयास वैभवशाली परंपरा आहे. कोविड काळात या महाविद्यालयाने विशेष उपक्रम राबवले आहेत. शहाजी ऊर्जा हा विद्यार्थ्यांना दिशा देणारा आणि त्यांना आर्थिक मदत करणारा उपक्रम आहे.
प्राचार्य डॉ. आर. के.शानेदिवाण म्हणाले, देणगी च्या पावणे आठ लाख रुपये व्याजातून दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना ही ऊर्जा पारितोषिके दिली जातात. आजी-माजी प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी व संस्थेचे, महाविद्यालयाचे हितचिंतक यांच्या उदार देणगीतून ही पारितोषिक योजना सुरू केलेली आहे. हा कार्यक्रम म्हणजे संपूर्ण व्यवस्थेचा कार्यक्रम झालेला आहे.
ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण, छत्रपती शाहू महाराज, श्रीपतराव बोंद्रे दादा यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत. विचारांचे प्रदूषण फार घातक असून ते स्वतः बरोबरच कुटुंबाला, समाजालाही उध्वस्त करते. त्यामुळे सतर्क राहून विचारांचे प्रदूषण दूर करा. या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या ठाणे येथील जिल्हाधिकारी विलासराव पाटील यांच्यासारखी जीवनात उंच भरारी घ्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
स्वागत व प्रास्ताविक समन्वयक डॉ.ए.बी.बलगुडे यांनी केले. महाविद्यालयाची ओळख डॉ.आर.डी.मांडणीकर यांनी करून दिली. डॉ.सरोज पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. पी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुरेश शिखरे यांनी आभार मानले.
वरिष्ठ विभागातील स्टुडन्ट ऑफ इयरचा पुरस्कार शरीफा समसुद्दीन हालदार हिला तर कनिष्ठ विभागातील पुरस्कार नाग समृद्धी शेख यांना देण्यात आला. शिवाजी विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केल्याबद्दल डॉ. कविता कुंभार व डॉ चंद्रभागा किरण पाटील यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. चालू वर्षी विद्यार्थ्यांच्या पारितोषकासाठी दहा हजार रुपयाची देणगी दिल्याबद्दल प्रा. डॉ. एम. आर. वैराट व माजी विद्यार्थी डॉ. गोपाळ गावडे यांचा सत्कार करण्यात आला.गुणवंत वाचक विद्यार्थी म्हणून माया विजय शिंदे, गुणवंत प्रशासकीय वाचक म्हणून सौ. अपर्णा गावडे व गुणवंत प्राध्यापक वाचक म्हणून डॉ. एस. एस. राठोड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ग्रंथ समीक्षेमध्ये ऋतुजा ज्ञानदेव व्हराम्बळे व सलोनी अजित कांबळे यांनी पारितोषिके मिळवली. गुणवंत प्रशासकीय सहकारी पारितोषिक शिवाजी राजाराम पाटील, गुणवंत सेवक पारितोषिक किशोर दिनकर भोसले यांनी पटकावले.
इतर पारितोषिक प्राप्त विद्यार्थी असे. प्रवीण विठ्ठल सुळेभावी, प्रथमेश रामचंद्र यादव, साक्षी धनाजी व्हरांबळे, समीक्षा संजय परमाज ,मोहम्मद कैफ बागवान ,भाग्यश्री रावसाहेब चव्हाण, नारायण विष्णू गावडे, निकिता सुनील पाटील, बबन राजाराम घोडके, निवास संजय बनकर, नंदिनी लक्ष्मण गुरव, ओमकार अशोक चित्रगर, तन्वी युवराज पाटील, साकेत संबोधी रविराज , सानिका सखाराम पाटील, संतोष महाळू हजारे, प्रवीण विठ्ठल सूर्यभावी,
महाविद्यालयात गुणवंत खेळाडू पारितोषिक प्राप्त विद्यार्थी असे: पृथ्वीराज प्रभाकर डांगे,फिजा सिकंदर देसाई, चेतन दत्तात्रेय परब, गायत्री कल्याण भड आदेश तानाजी पाटील, श्रुतिका संदीप पवार, सौरभ संजय चौगुले, बाबर सुमन विजय, अवधूत संजय शिरोळे, नम्रता दत्तात्रय शिंदे, दिव्या गोरखनाथ खैरमोडे, पुनम संजय सातपुते, संजना माणिक पाटील, ऋतुजा रामराव पाटील, गौरी अनुजा आनंद, ऋतुजा लक्ष्मण पाटील ,श्रुती रजनीकांत मिस्त्री, अनुजा आनंद गवळी ,नितीन उत्तम चौगुले, निकिता नागेश पाटील, निखिल भीमराव जाधव, अस्मिता प्रशांत गायकवाड, मदिना इम्तियाज खाटीक, आकांक्षा अरविंद पवार, गौरी शहाजी काशीद, खेडकर सत्यजित सर्जेराव, आकांक्षा अरविंद पवार, जयश्री संभाजी टिपूगडे, मेंडोसा अलविना रॉबर्ट ,अमृता अनिल माने या विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्रे आणि रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे, मानद सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.
शहाजी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न
|