बातम्या
राजाराम कारखान्याची उद्या वार्षिक सभा.....
By nisha patil - 9/28/2023 11:22:19 PM
Share This News:
कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण वार्षिक सभा २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये विरोधी गटाचे आमदार सतेज पाटील यांनी राजारामच्या कारभाऱ्यांवर जोरदार टीका केली. सत्ताधाऱ्यांकडून कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढवण्यात येणार असून, होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यासंदर्भातील पोटनियम दुरुस्तीचा ठराव करण्यात येणार आहे. या मुद्दावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
ठरावानुसार कार्यक्षेत्रात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचा समावेश करण्यात येणार असून, सध्या कार्यक्षेत्रात असलेल्या तालुक्यातील नव्या ४२ गावांचा समावेशही होणार आहे. वाढीव कार्यक्षेत्रात कोल्हापूर दक्षिणमधील १४, हातकणंगले तालुक्यातील १४, वाळवा तालुक्यातील येलूरसह १३ व पन्हाळा तालुक्यातील वाघवे अशा ४२ नव्या गावांचा यात समावेश होणार आहे.
राजाराम कारखान्याची उद्या वार्षिक सभा.....
|