बातम्या

पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत असलेली आणखी एक 'अंजू' पोलिसांच्या ताब्यात

Another Anju who was preparing to flee to Pakistan is in police custody


By nisha patil - 7/29/2023 5:23:53 PM
Share This News:



सध्या सीमेपलिकडील प्रेमकहाण्या चर्चेत आहेत. पाकिस्तानी सीमा हैदर  भारतात पळून आली आणि तिने भारतीय सचिनसोबत लग्न केलं. त्यानंतर भारतीय अंजू पाकिस्तानात पळून गेली आणि तिने तिथे प्रियकर नसरुल्लासोबत लग्न केलं. सीमा आणि अंजूची कहाणी समोर आल्यापासून सीमेपलीकडच्या अनेक प्रेमकहाण्या समोर येऊ लागल्या आहेत. आता जयपूर विमानतळावर पाकिस्तानात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या 16 वर्षीय तरुणीला पकडण्यात आले आहे.जयपूर विमानतळ पोलिसांनी शुक्रवारी, 28 जुलै रोजी एका अल्पवयीन मुलीला पाकिस्तानला जाण्यासाठी तिकीट बुक करण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा दाखविण्यात अयशस्वी ठरल्याने तिला ताब्यात घेतले. गजल परवीन असं या किशोरवयीन तरुणीचं नाव आहे. ही तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.या अल्पवयीने मुलीने दावा केला आहे की, ती मूळची पाकिस्तानातील लाहोरची रहिवासी असून तीन वर्षांपूर्वी भारतात आली होती. त्या काळात ती राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील श्रीमाधोपूर भागात तिच्या मावशीकडे राहत होती. ही अल्पवयीन मुलगी पाकिस्तानातील प्रेमीला भेटायला जात होती. मुलगी लाहोरमधील इंस्टाग्राम प्रेमी अस्लम लाहोरीला भेटायला जात होती, अशी माहिती समोर आली आहे.अल्पवयीन मुलगी इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या पाकिस्तानी तरुणाला भेटायला निघाली होती. या मुलीची लाहोरमधील अस्लम लाहोरी नावाच्या मुलाशी मैत्री झाली होती. त्याने स्वत:ला पाकिस्तानी असल्याचं सांगून लाहोरमध्ये भेटण्यासाठी बोलावलं होतं. त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून मुलीने विमानतळावर पोहोचून पाकिस्तानचे तिकीट मागितले, पण तिच्याकडे पासपोर्ट किंवा व्हिसा नव्हता. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.विमानतळ स्टेशनचे प्रभारी दिग्पाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीकरमधील श्रीमाधोपूर येथील रहिवासी असलेली ही अल्पवयीन मुलगी पाकिस्तानला जाण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांशिवाय शुक्रवारी जयपूर विमानतळावर पोहोचली. इंस्टाग्रामवर मैत्री झालेल्या तरुणाला भेटण्यासाठी पाकिस्तानला जाण्यासाठी विमानतळावर आल्याचे मुलीने चौकशीदरम्यान सांगितलं. या मुलीकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. मुलीच्या कुटुंबीयांना याबाबत कळवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अल्पवयीन मुलगी पाकिस्तानात जाण्याच्या इराद्याने तिकीट काढण्यासाठी विमानतळावर गेली होती. मुलीकडे मोबाईल किंवा ओळखपत्र आणि प्रवासासंबंधित कागदपत्रे नव्हती नाही. ही मुली बारावी पास आहे. पाकिस्तानातील लाहोरमधील अस्लम लाहोरी याच्यासोबत तरुणीची इंस्टाग्रामवर मैत्री झाली. त्याने तरुणीला लाहोरला भेटायला बोलावलं. त्यानंतर ही मुलगी विमानतळावर पोहोचली आणि बुरखा परिधान तिकीट काढायला गेली.मुलीने एका वर्षापासून संबंधित तरुणाशी मैत्री असल्याचा दावा केला आहे. दोघांची इंस्टाग्रामवर मैत्री झाली. अस्लमची मुलीच्या आणखी एका वर्गमित्राशीही मैत्री असल्याचं मुलीने सांगितलं. इंस्टाग्रामच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात होते. मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या संदर्भात माहिती दिली. ही पाकिस्तानी नसून भारतीय असल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे.


पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत असलेली आणखी एक 'अंजू' पोलिसांच्या ताब्यात