बातम्या
श्री महालक्ष्मी मंदिरात सामूहिक आरतीचा दुसरा उपक्रम
By nisha patil - 8/2/2025 7:54:13 PM
Share This News:
श्री महालक्ष्मी मंदिरात सामूहिक आरतीचा दुसरा उपक्रम
कोल्हापूर (दि. ८) – ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या निर्णयानुसार कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरात दुसऱ्यांदा सामूहिक आरती पार पडली. शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.१० वाजता झालेल्या या आरतीचे विधीवत आयोजन ‘वडार समाज संघटना’चे शहराध्यक्ष संजय शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू यादव, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते. आरतीनंतर संपूर्ण मंदिर परिसर जयघोषांनी दुमदुमून गेला.
यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा सहसंयोजक अभिजित पाटील यांनी हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
श्री महालक्ष्मी मंदिरात सामूहिक आरतीचा दुसरा उपक्रम
|