बातम्या

जिद्द फौंडेशन राबवला एक आगळा वेगळा उपक्रम.

Another different initiative implemented by Jidd Foundation


By nisha patil - 8/7/2024 5:45:55 PM
Share This News:



वटपोर्णिमेच्या निमीत्त जिद्द फौंडेशनच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला."शृंगार माझा अधिकार या कार्यक्रमांतर्गत विधवा महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आणि माहेरचा आहेर असा अनोखा उपक्रम संस्थापक अध्यक्ष गीतांजली ठोबे यांनी पाचगाव येथील चिले हॉलमध्ये आयोजित केला होता या कार्यक्रमाला महिलांनी जुन्या परंपरेला फाटा देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली . विधवा महिलांना समाजात इतर महिलांच्या बरोबरीने  मानसन्मान मिळाला पाहिजे या विचाराने ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले.अशा महिलांना हळदी कुंकूचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळावा हा जिद्द फौंडेशनच्या संस्थापिका सौ.गिताजंली डोंबे यांनी प्रामाणिक प्रयत्न केला असून याच सर्वत्र कौतुक होत आहे. अशा महिलांना मायेची ऊब व आधार म्हणून जिद्द फौंडेशन  उपक्रम राबविण्याचे धाडस केले. त्याचबरोबर सर्वानी मिळुन या प्रथा बंद करून या स्त्रियांना समाजात सन्मानाने मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देऊ या. हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याच काम जिद्द फाउंडेशन ने केल आहे  या महिलांना स्वामी शांती ट्रस्ट कडून माहेरचा आहेर देण्यात आला
 

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती स्वामी शांती प्रकाश ट्रस्टचे रमेश  तनवाणी ,ब्रिजलाल ललवाणी विजय शिंदे, प्रसिद्ध अभिनेते मदन पंलगे ,सरपंच प्रियांका पाटील,मा.महापौर अश्विनी रामाणे ,नविता नाईक , अश्विनी चीले तेजस्विनी काशीद,आशाराणी थडके , वर्षा जोशी, किरण लाटकर  सारिका भास्कर तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच मीडिया पार्टनर म्हणून ताराने न्यूजने काम पाहिले


जिद्द फौंडेशन राबवला एक आगळा वेगळा उपक्रम.