बातम्या
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
By nisha patil - 10/19/2023 3:32:09 PM
Share This News:
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
एज्युकेशन वर्ल्ड च्या 2023 च्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल डे कम बोर्डिंग सीबीएसई स्कूल महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची शाळा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे स्कूल ठरले. एज्युकेशन वर्ल्ड व एज्युकेशन टुडे या दोन्ही नामांकित संस्थांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव सीबीएसई शाळा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ठरली.
एज्युकेशन वर्ल्डने नवी दिल्ली येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतातील सर्व टॉप स्कूल विजेत्यांच्या पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे विश्वस्त विनायक भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
देशातील 18000 शाळांच्या सर्वेक्षण फॉर्ममधून टॉप स्कूल्सची निवड करण्यात आली. अल्पावधीतच संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान झाले आहे.डे कम बोर्डिंग स्कुलचा शैक्षणिक दर्जा, शिक्षकांची गुणवत्ता व योग्यता , सहशालेय उपक्रम, क्रीडा शिक्षण, डिजिटल लर्निंग, विद्यार्थ्यांची प्रगती आणि गुणवत्ता, अध्ययन- अध्यापन गुणवत्ता, व्यवस्थापनातील नेतृत्व, पालकांचा सहभाग, दहावी बारावी बोर्ड परीक्षेचा उत्कृष्ट निकाल, शैक्षणिक सुविधा या मूल्यांकन निकषांवर शाळांचे वर्गीकरण करण्यात आले. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्रातील नंबर वन स्कूलची निवड करण्यात आली. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकामध्ये राहिले.
परीक्षकांचे गुण, पालकांची मते व एज्युकेशन वर्ल्ड टीमचे सर्वेक्षण यावर आधारित हा निकाल जाहीर झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे सीबीएसई डे कम बोर्डिंग स्कूल म्हणून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला बहुमान प्राप्त झाला. एज्युकेशन वर्ल्ड व एज्युकेशन टुडे या संस्थाकडून प्राप्त झालेल्या झालेल्या पुरस्काराबद्दल चेअरमन संजय घोडावत यांनी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांच्या कार्याचे व सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या कामाचे कौतुक केले.
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
|