बातम्या

अनुष्का पाटील ची नेमबाजीत विद्यापीठ संघात निवड

Anushka Patil selected for Varsity team in shooting


By nisha patil - 11/24/2023 5:09:53 PM
Share This News:



अनुष्काने 10 मीटर एअर पिस्तल व 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तल या दोन्ही गटात निर्विवाद वर्चस्व मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेमध्ये जवळपास 40 महाविद्यालयातून 105 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या यशामुळे अनुष्काची नवी दिल्ली येथे 8 ते 11 डिसेंबर 2023 मध्ये होणाऱ्या 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तल गटाच्या अखिल भारतीय विद्यापीठ अंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली .तसेच 3 ते 8 जानेवारी 2024 दरम्यान कुरुक्षेत्र ,हरियाणा येथे होणाऱ्या साऊथ वेस्ट झोन युनिव्हर्सिटी शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी ही अनुष्का शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे . अनुष्का गडहिंग्लज च्या शिवराज कॉलेजची विद्यार्थिनी असून क्रीडा प्रबोधनची ही अनिवासी विद्यार्थिनी आहे तिला प्राचार्य सुहास पाटील संदीप तरटे यांचे मार्गदर्शन लाभलं अनुष्का योग चॅम्पियन असून कमला कॉलेज येथे योग विषयाची उच्च शिक्षण ती घेत आहे तिला ताराराणी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉक्टर क्रांतीकुमार पाटील  यांचे प्रोत्साहन मिळत आहे


अनुष्का पाटील ची नेमबाजीत विद्यापीठ संघात निवड