बातम्या
महायुती सरकारने सुरू केलेली कुठलीही योजना बंद होणार नाही : ना. हसन मुश्रीफ
By nisha patil - 6/1/2025 10:23:55 PM
Share This News:
महायुती सरकारने सुरू केलेली कुठलीही योजना बंद होणार नाही : ना. हसन मुश्रीफ
कडगाव - कौलगे जिल्हा परिषद मतदार संघाच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभ
कौलगे जिल्हा परिषद मतदार संघाच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. महायुती सरकारने सुरू केलेली कुठलीही योजना बंद होणार नसून आगामी सर्व निवडणुकीतही जनता महायुतीलाच साथ देईल, असा विश्वास ना. हसन मुश्रीफांनी व्यक्त केलाय.
कौलगे जिल्हा परिषद मतदार संघाच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कागल विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत सात हजार कोटीची विकास कामे केलीत. उर्वरित विकासकामे करण्याचे नियोजन केल्याचे ना. हसन मुश्रीफ सांगितले, लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याचे सांगत लाडक्या बहिणींना महिन्याला २१०০ रुपये मिळायला सुरुवात होईल असेही स्पष्ट केले. महायुती सरकारने सुरू केलेली कुठलीही योजना बंद होणार नसून आगामी सर्व निवडणुकीतही जनता महायुतीलाच साथ देईल, असा विश्वास ना. हसन मुश्रीफांनी व्यक्त केलाय. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देऊन ना. हसन मुश्रीफांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील - गिजवणेकर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संग्रामसिंह कुपेकर, केडीसीसी बँकेचे संचालक संतोष पाटील, यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महायुती सरकारने सुरू केलेली कुठलीही योजना बंद होणार नाही : ना. हसन मुश्रीफ
|