बातम्या

पैसे दिले की कुणबी दाखला कोणीही काढू शकतो

Anyone can get the Kunbi certificate once the money is paid


By nisha patil - 8/9/2023 7:08:58 PM
Share This News:



पैसे दिले की कुणबी दाखला कोणीही काढू शकतो

  कोल्हापुरात नागरिकांचा आरोप

कागदपत्रे पाहून दाखल्याचा दर

 

एकीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जालनामध्ये जरांगे पाटील यांच्या  नेतृत्वात आंदोलन सुरू असताना कोल्हापुरात कुणीबी दाखला काढण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याचे नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. आपले सरकार केंद्र चालकच या रॅकेट चे सूत्रधार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कुणबी दाखला काढण्यासाठी आलेले व्यक्तीकडील कागदपत्रे पाहूनच दाखल्याचा दर सांगितला जात आहे. त्यानंतर सांगितलेलं पैसे दिले तरच दाखल्यासाठी पुढची कारवाई सुरू होते. तसेच एखाद्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला तर पूर्वीच्या कागदपत्रातील "कु " चे कुळवाडी म्हणजे मराठा आहे त्यामुळे तुम्हाला दाखला मिळणार नाही असे स्पष्ट उत्तर आपले सरकार केंद्र चालकाकडून नागरिकांना दिले जाते. कुणबी दाखल्यासाठी दिलेल्या पैशांमध्ये तलाठी ,सर्कल ,नायब तहसीलदार , प्रांताधिकारी यांचाही वाटा असतो असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पैसे द्या आणि कुणीही कुणबी दाखला काढा असा प्रकार कोल्हापूरमध्ये सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.


पैसे दिले की कुणबी दाखला कोणीही काढू शकतो