बातम्या
कोचिंग क्लास वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सर्व क्लास संचालकांना आवाहन
By neeta - 1/25/2024 4:40:22 PM
Share This News:
कोल्हापूर: गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने खाजगी क्लासेस साठी नवीन नियमावली नुकतीच घोषित केली आहे. ही नियमावली खाजगी क्लासेस धारकांना विश्वासात न घेता जारी केली आहे., ही नियमावली आम्हाला मान्य नसून केंद्र सरकारने नवीन नियमावली जारी करावी. अशी मागणी आज कोचिंग क्लास वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदमध्ये करण्यात आली.
खासगी कोचिंग सेंटर्सच्या मनमानीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली तयार केली आहे. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता कोणीही कुठेही आणि केव्हाही खाजगी कोचिंग सेंटर उघडू शकणार नाही. तसेच 16 वर्षांखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नाही तर कोचिंग सेंटर्स कोणत्याही विद्यार्थ्याकडून मनमानी शुल्क आकारू शकणार नाहीत. अशी अनेक नियमावली केंद्र सरकारने खाजगी कोचिंग सेंटरला लागू केली आहे. या नियमावलीचे उल्लंघन केल्यास कोचिंग सेंटर्सवर मोठा गुन्हा नोंद करण्यात येणार आहे
हे खाजगी कोचिंग सेंटरवर अन्याय असून जी बेरोजगार बी एड,डी एड झालेली शिक्षक नोकरी न मिळाल्यावर कोचिंग सेंटर चालून स्वतःचं पोट भरत असतात त्यांच्यावर हा अन्याय असून या अन्याला विरोध करण्यासाठी २८ जानेवारीला खासबाग मैदान येथे खाजगी क्लास संघटनेचा महामेळावा होणार आहे . या महामेलाव्याला सर्व कोचिंग क्लास संचालकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष उदय शिपेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली
यावेळी जिल्हाध्यक्ष उदय शिपेकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश ननवरे, शहर उपाध्यक्ष एन एस निळपणकर, मार्गदर्शक बी एस पाटील, अतुल नींगुरे, प्रकाश मोरे, राहुल टेकावळे आधी सह मान्यवर उपस्थित होते
कोचिंग क्लास वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सर्व क्लास संचालकांना आवाहन
|