बातम्या
नागरिकांनी अफवांना बळी न पडण्याचे आवाहन
By nisha patil - 2/1/2024 12:25:24 PM
Share This News:
नागरिकांनी अफवांना बळी न पडण्याचे आवाहन
कोल्हापूर : HPCL,BPCL, व IOCL या तेल कंपन्यामधून LPG व पेट्रोल डिझेल ची वाहतूक करणारे वाहतूकदारांनी दि 1जाने पासून संप पुकारला होता. दरम्यान वाहतूकदारांनी रात्री उशिरा संप माघारी घेतला. यामुळे या पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक पूर्वरत होत आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
याबाबत जिल्हा प्रशासन संबंधित तेल कंपन्या यांच्या विक्री प्रतिनिधी च्या संपर्कात असून पेट्रोल डिझेल यांच्या वितरणात कोणत्याही प्रकारे अडथळा होऊ नये यासाठी आवश्यक पडल्यास अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत या वस्तू जीवनाश्यक वस्तू अंतर्भाव असलेने त्याची वाहतूक व वितरण सुरळीत राहील याची दक्षता जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेणेत येत आहे.
यामुळे जनतेने कोणत्याही अफवेला बळी पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करणेत येत आहे.
नागरिकांनी अफवांना बळी न पडण्याचे आवाहन
|