बातम्या
मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातील कुक्कुट प्रशिक्षणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
By nisha patil - 3/21/2025 4:53:22 PM
Share This News:
मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातील कुक्कुट प्रशिक्षणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, कोल्हापूर येथील कुक्कुट प्रक्षेत्रावर प्रशिक्षणार्थींसाठी वर्षभर कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींनी मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, नवीन सर्कीट हाऊस जवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एस.एम. राऊत यांनी केले आहे.
यामध्ये 5 दिवस कुक्कुटपालन प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी 200 रुपये सेवाशुल्क, 15 दिवसासाठी 500 रुपये सेवाशुल्क असणार असून व ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीने प्रशिक्षण असणार आहे. तर
30 दिवसासाठी 2 हजार रुपये व 6 महिन्यासाठी 4 हजार रुपये सेवाशुल्क असणार असून प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने असणार आहे.
सर्व प्रशिक्षणासाठी आधार कार्ड, शिक्षण दाखला (10 वी 12 वी मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला), दोन फोटो व जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत. प्रशिक्षणामध्ये देशी, मांसल पक्षी व अंड्यावरील पक्ष्यांच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती देण्यात येत असल्याचे श्री. राऊत यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातील कुक्कुट प्रशिक्षणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन
|