बातम्या

अभय योजना-2023 अंतर्गत ऑगस्ट 2024 अखेर मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Appeal to take advantage of concession scheme in stamp duty and penalty under Abhay Yojana 2023 by the end of August 2024


By nisha patil - 10/7/2024 9:43:16 PM
Share This News:



महसूल व वन विभागाच्या दिनांक 07 डिसेंबर 2023 च्या आदेशानुसार थकित असलेल्या मुद्रांक शुल्काचा भरणा करण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजना-2023 शासनाने दोन टप्यामध्ये जाहीर केली आहे. योजनेचा पहिला टप्पा 1 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये राबवण्यात आला असुन योजनेच्या पहिल्या टप्यामध्ये शासनाने दिलेल्या सवलतीचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेतला आहे. योजनेचा दुसरा टप्पा 1 मार्च 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधी दरम्यान राबवण्यात येत आहे. दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी किंवा त्यानंतर दाखल होणा-या नवीन प्रकरणांना अभय योजना लागू राहणार नाही. योजनेतील 20 टक्के मुद्रांक शुल्क व 80 टक्के दंड सवलतीचा लाभ 31 ऑगस्ट 2024 पर्यत लागू असल्याने जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी केले आहे.

 दुस-या टप्यातील योजनेची ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे-

महाराष्ट्र अभय योजना 2023 अन्वये योजनेचा दुसरा टप्पा 1 मार्च ते 31 ऑगस्ट 2024 पर्यत राबवली जाणार असुन दि 1 जानेवारी 1980 ते डिसेंबर 2020 पर्यत निष्पादीत झालेल्या प्रकरणांमध्ये 1 रुपये ते 25 कोटी पर्यंतच्या प्रकरणांमध्ये दुस-या टप्यामध्ये मुद्रांक शुल्कामध्ये 20 टक्के सवलत दिली असुन दंडामध्ये 80 टक्के सवलत दिली आहे.

 महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 बाबत अधिक माहितीसाठी अभय योजना कक्ष मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा रोड, कोल्हापूर तसेच यांचे अधिनस्त दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही वाघमोडे यांनी पत्राव्दारे कळविले आहे.


अभय योजना-2023 अंतर्गत ऑगस्ट 2024 अखेर मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन