बातम्या
शहीद सैनिकांची माहिती १० मार्चपूर्वी अद्यावत करण्याचे आवाहन
By nisha patil - 2/25/2025 8:47:03 PM
Share This News:
शहीद सैनिकांची माहिती १० मार्चपूर्वी अद्यावत करण्याचे आवाहन
कोल्हापूर, : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत शहीद सैनिकांची माहिती अद्यावत करण्याचे काम सुरू असून, तीन डिजिटल बोर्डावर नावे प्रदर्शित केली जाणार आहेत.
यासाठी १८१ शहीद जवानांची यादी तयार करण्यात आली आहे. जर कोणत्याही शहीद सैनिकांची माहिती दुरुस्त करायची असेल, तर १० मार्च २०२५ पूर्वी कार्यालयात भेट द्यावी किंवा ९१७२०३५६१२ या मोबाईल क्रमांकावर किंवा zswo_kolhapur@maharashtra.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.
शहीद सैनिकांची माहिती १० मार्चपूर्वी अद्यावत करण्याचे आवाहन
|