बातम्या

आप्पी पाटील यांचा शाहू महाराजांना पाठिंबा...

Appi Patil supports Shahu Maharaj


By nisha patil - 6/4/2024 1:25:02 PM
Share This News:



 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना अप्पी पाटील यांनी कोल्हापुरात येऊन माझ्या तसेच मालोजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पाठिंबा जाहिर केला. त्यांच्या पाठिंब्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू महाराजांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल याची खात्री वाटते. 

याप्रसंगी विजयराव पाटील, सोमगोंडा आरबोळे, राजू खमलेट्टी, प्रशांत शिंदे, संभाजी नाईक, दयानंद पट्टणकोटी, सोमनाथ पाटील, भरमा केसरकर, अर्जुन दिवटे, भीमराव पट्टणकोटी, गौतम कांबळे, शैल पाटील, भुजंग नाईक, फिरोज सोलापूरे, संदीप कोकितकर, महम्मद पठाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आप्पी पाटील यांचा शाहू महाराजांना पाठिंबा...