बातम्या

एमबीए, एमसीए प्रवेश परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Application process for MBA MCA entrance exam has started


By nisha patil - 9/1/2025 8:01:18 PM
Share This News:



 एमबीए, एमसीए प्रवेश परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

एमबीए प्रवेश परीक्षा १, २ व ३ एप्रिल तर एमसीएची प्रवेश परीक्षा २३ मार्चला होणार आहे. परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात झालीय. 'डीटीई' कडून एमबीए व एमसीए प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी आहे. शिवाजी युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बापूसाहेब सावंत, सचिव डॉ. प्रवीण जाधव यांनी अर्ज भरावेत अशी माहिती दिलीय.

 एमबीए प्रवेश परीक्षा १, २ व ३ एप्रिल तर एमसीएची प्रवेश परीक्षा २३ मार्चला होणार आहे. परीक्षेसाठीचे अर्ज भरण्यास सुरुवात झालीय. 'डीटीई' कडून एमबीए व एमसीए प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी आहे. विद्यार्थी- विद्यार्थिनींनी www. mahacet. org या संकेस्थळावर जाऊन अर्ज भरावेत, अशी माहिती शिवाजी युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बापूसाहेब सावंत, सचिव डॉ. प्रवीण जाधव यांनी दिली. प्रवेश परीक्षा दिली तरच शासनाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या सवलतींसाठी विद्यार्थी पात्र ठरतात. परीक्षेमुळे शैक्षणिक शुल्कात सवलती मिळतात, तरी विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा द्यावी, असे आवाहन 'सुम्टा'च्या वतीने करण्यात आलंय.


एमबीए, एमसीए प्रवेश परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु
Total Views: 70