बातम्या

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

Applications for the Shiv Chhatrapati State Sports Award should be submitted by January 22


By nisha patil - 4/1/2024 1:44:30 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. 4 : राज्य शासनाच्यावतीने दरवर्षी राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2022-23 वर्षाच्या पुरस्कारासाठी 8  ते 22 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी केले आहे.
 

पुरस्कारामध्ये ज्येष्ठ क्रीडा महर्षींकरीता जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पुरस्कारासाठी अर्ज सादर करणा-या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडूंनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर दि. 8 ते 22 जानेवारी दरम्यान 22 जानेवारी रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.


शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत