बातम्या
दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कारासाठी अर्ज करा
By nisha patil - 6/20/2023 5:27:12 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२३ करिता नामांकन व अर्ज मागविण्यात येत आहेत. गृह कामकाज मंत्रालयाच्या www.awards.gov.in या केंद्रीकृत पोर्टलवर १५ जून ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत. दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी ज्यांनी योगदान दिले आहे त्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार २०२३ साठी अर्ज, नामांकने करताना पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्यांची माहिती, उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याच्या सविस्तर वर्णनासह भरावी. समक्ष अथवा पोस्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पात्रता निकष व इतर सविस्तर तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही श्री. घाटे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कारासाठी अर्ज करा
|