बातम्या

महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी श्री संजय पाटील यांची नियुक्ती

Appointment of Mr Sanjay Patil as West Maharashtra President of Maharashtra Police Friends Association


By nisha patil - 2/12/2023 9:32:44 PM
Share This News:



महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी श्री संजय पाटील यांची नियुक्ती 

कोल्हापूर 2 डिसेंबर( प्रतिनिधी) मार्शल योगा संचलित महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी जनसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकरांच्या ,कामगारांच्या, वंचितांच्या प्रश्नावर लक्षवेधी आंदोलन करणारे कोल्हापूरचे संजय पाटील यांची निवड आंतरराष्ट्रीय योग सदगुरू आणि स्वच्छ निवृत्त राज्य गुप्तचर विभाग मुंबईचे पोलीस अधिकारी ,मराठी विश्वकोश मंडळाचे महाराष्ट्र शासन सदस्य डॉ कृष्णदेव गिरी व कार्याध्यक्ष तसेच दैनिक रोखठोक चे संपादक डॉक्टर सुरेश राठोड यांनी केली
    
पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणून काम करणार तसेच राज्यातील पोलिसांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणार असे निवडीनंतर श्री संजय पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील निवडी लवकरच करण्यात येणार असून इच्छुकांनी संपर्क साधावा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा व्यापक मेळावा घेण्यात येणार असून त्यासाठी पोलीस विभागातील तसेच अन्य क्षेत्रातील उच्च पदस्थ अधिकारी यांना निमंत्रित केले जाणार आहे असे संजय पाटील यांनी सांगितले 


महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी श्री संजय पाटील यांची नियुक्ती