ताज्या बातम्या

रविकिरण गवळी यांची कोल्हापूर उत्तर संयोजकपदी नियुक्ती

Appointment of Ravikiran Gawli as Kolhapur North Coordinator


By nisha patil - 2/26/2025 2:45:09 PM
Share This News:



रविकिरण गवळी यांची कोल्हापूर उत्तर संयोजकपदी नियुक्ती

भारतीय जनता पार्टीच्या विश्वकर्मा योजना समितीच्या संयोजक पदी निवड

भाजपाच्या संघटनात्मक बांधणीस नवी ऊर्जा – पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

भारतीय जनता पार्टीच्या विश्वकर्मा योजना समितीच्या कोल्हापूर उत्तर संयोजकपदी रविकिरण गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी त्यांची निवड झाल्याने पक्षाच्या संघटनात्मक बळकटीस नवी ऊर्जा मिळणार आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या नियुक्तीबाबत भाजपाचे कोल्हापूर पश्चिम जिल्हा सरचिटणीस डॉ. आनंद गुरव असंडोलीकर यांनी विशेष उल्लेख केला आहे. त्यांनी सांगितले की, "रविकिरण गवळी यांच्याकडे पक्ष विस्तार आणि समाजातील विविध घटकांच्या समस्या सोडवण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पक्ष अधिक बळकट होईल, तसेच सशक्त संघटना निर्माण करण्यास हातभार लागेल."

यावेळी भाजपाचे जिल्हा समन्वयक आणि जिल्हा विश्वकर्मा योजना समितीचे जिल्हाधिकारी नियुक्त सदस्य श्री. संगम नेसरीकर आणि जिल्हा सहसंयोजक, जिल्हा नियोजन समिती सदस्य (जिल्हाधिकारी नियुक्त) श्री. अर्जुन सुतार यांनीही गवळी यांचे अभिनंदन केले.


रविकिरण गवळी यांची कोल्हापूर उत्तर संयोजकपदी नियुक्ती
Total Views: 81