बातम्या

लक्ष्मी औद्योगिक वसाहती येथे सिईटपी प्रकल्प उभारण्यासाठी 531 कोटी रुपयांची मान्यता...

Approval of Rs 531 crore for construction of CITP project at Lakshmi Industrial Estate


By nisha patil - 6/17/2024 8:22:59 PM
Share This News:



 ताराराणी पक्ष कार्यालय, इचलकरंजी येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न.. याप्रसंगी आमदार प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांनी  इचलकरंजी शहरात लक्ष्मी औद्योगिक वसाहत याठिकाणी सीईटपी प्रकल्प उभारण्यासाठी 531 कोटी रुपयांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक तरतुदीची मागणी केली असल्याची माहिती आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी दिली.
       

या माध्यमातून पंचगंगा नदी प्रदुषणाचा प्रश्‍न सुटेल तसेच उद्योग, वस्त्रोद्योग, प्रदुषण अधिकाऱ्यांची व एमआयडीसीचे अधिकारी यांची बैठक होऊन सुरत येथील कंपनीकडून डीपीआर तयार करण्यात आला होता. त्यामध्ये 15 एमलडीचा वाढीव तसेच पार्वती व लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये प्रत्येकी 5 एमलडीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
           

शहरातील शुद्ध पेयजल प्रकल्प सुरु करावेत यासाठी आपण प्रयत्नशिल असून 255 कोटी रुपयांची भुयारी गटार योजनेमध्ये आणखी काही योजना व भाग समाविष्ट करून 488 कोटींचा प्रकल्प तसेच नगरोत्थान योजनेतून 100 कोटी रुपये रस्त्यासाठी आदी विषयांना मुंबई होणार्‍या बैठकीत मंजुरी मिळेल यासाठी प्रयत्नशिल असल्याचे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सांगितले.

यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, ताराराणी महिला आघडीच्या अध्यक्षा उर्मिला गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, माजी नगरसेवक सुनील पाटील,  के.ई.टी.पी. संचालक नरसिंह पारीख, ताराराणी युवा अध्यक्ष सतीश मुळीक, यशवंत प्रोसेसचे चेअरमन श्रेणिक मगदूम, माजी आरोग्य सभापती संजय केंगार, माजी शिक्षण सभापती राजू बोंद्रे, पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, नितेश पोवार, कपिल शेटके व पत्रकार उपस्थित होते.


लक्ष्मी औद्योगिक वसाहती येथे सिईटपी प्रकल्प उभारण्यासाठी 531 कोटी रुपयांची मान्यता...