बातम्या

' अप्सरा" चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च...

Apsara trailer launched on social media


By nisha patil - 2/5/2024 5:31:40 PM
Share This News:



सुनील भालेराव यांच्या श्रवण फिल्म्स या निर्मिती संस्थेतर्फे अप्सरा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. प्रेम राजकारण ॲक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी अप्सरा या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर सध्या लॉंच करण्यात आला असून अप्सरा हा चित्रपट येत्या 10 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे .

चित्रपट सृष्टीत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि दिग्दर्शन केला आहे चित्रपटातील तीनही गाण्याचे लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केला असून या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून प्रदारपण केला आहे गायक अभय जोधपूरकर गायका आनंदी जोशी ओंकार स्वरूप भैय्या मोरे मेघा मुसळे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आले असून ही गीते प्रेक्षकांच्याही पसंती सुतरले आहेत अभिनेता सुयश झुंजुळके अभिनेत्री मयुरी आव्हाड अक्षता पाडगावकर अभिनेत्री मेघा घाडगे शशांक शेंडे विठ्ठल काळे मयूर पवार खानदेश रत्न सचिन कुमावत विजय निकम राजेश भोसले आशिष वारंग समीक्षा भालेराव प्रज्ञा त्रिभुवन संघर्ष भालेराव अशी तगडी स्टार कास्ट या चित्रपटात आहे.


' अप्सरा" चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च...