बातम्या

'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान धोकादायक स्टंट करताना अर्चना गौतम जखमी

Archana Gautam injured while doing a dangerous stunt during the shooting of Khatron Ke Khiladi 13


By nisha patil - 6/13/2023 5:05:56 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी a13' या सिनेमाचं सध्या दक्षिण आफ्रिकेत शूटिंग सुरू आहे. या लोकप्रिय कार्यक्रमात छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार सहभागी झाली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अनेक स्पर्धक स्टंटदरम्यान जखमी झाले आहेत. आता अभिनेत्री अर्चना गौतमदेखील  धोकादायक स्टंट करताना जखमी झाली आहे.अर्चना गौतमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर जखम झालेली दिसत आहे. अर्चनाला ही जखम 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान स्टंटबाजी करताना झाली आहे. अर्चनाने सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, अर्चनाचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत आहेत. अर्चनाची जखम लवकरात लवकर ठिक व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.


'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान धोकादायक स्टंट करताना अर्चना गौतम जखमी