बातम्या

डोकेदुखीमुळे तुम्हीही आहात का त्रस्त ? या तेलाच्या वापराने मिळेल क्षणार्धात आराम

Are you also suffering from headaches


By nisha patil - 7/15/2023 7:30:42 AM
Share This News:



डोकेदुखीमुळे तुम्हीही आहात का त्रस्त ? या तेलाच्या वापराने मिळेल क्षणार्धात आरा

डोकेदुखी ही अतिशय कॉमन समस्या आहे. ज्याचा अनेक लोकांना त्रास होताना दिसतो. स्ट्रेस, ताण-तणाव, झोपेची कमतरता यासारख्या अनेक कारणांमुळे डोकेदुखी वाढू शकते.

मात्र काही वेळा या वेदना इतक्या वाढतात की आपले दिवसभराचे कामकाज, दिनचर्या यांच्यावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत, काही जण औषधे घेऊन डोकेदुखी थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र औषधांचा सारखा वापर करणेही योग्य नाही. त्यामुळे औषधे घेण्यापूर्वी काही विशिष्ट तेलाचा (herbal oil) वापर करून, त्याने मालिश केल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते.

हे एक प्रकारचे नैसर्गिक पेनकिलर आहेत, ज्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि डोकेदुखीपासूनही आराम मिळतो. हे तेल कोणते व त्याचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया.

या तेलामुळे डोकेदुखीपासून मिळतो आराम

पुदीन्याचे तेल

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही पुदिन्याचे तेल लावून डोक्याला मसाज करू शकता. पुदिन्यात मेन्थॉल असते जे स्नायूंना आराम देते. हे मज्जातंतूंना चालना देऊन वेदना सुन्न करते. यासोबतच या तेलाची खास गोष्ट म्हणजे यामुळे चिंता व स्ट्रेस कमी होतो आणि आपल्याला तणावमुक्त वाटते. या तेलाने मसाज केल्याने मज्जासंस्था शांत करून डोकेदुखी दूर होते. पुदीन्यात जवळपास 44 टक्के मेंथॉल असते ज्यामुळे मायग्रेनही कमी होऊ शकते. तुम्हालाही डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही पुदिन्याचे तेल, पुदिन्याचा चहा पिऊ शकता. यामुळे तुम्हाला बराच आराम मिळू शकतो.

कॅमोमाइल ऑईल

थकवा, चिंता यामुळे डोकेदुखी होऊ शकते. अशा परिस्थितीत आपण कॅमोमाइल ऑईलने मसाज करू शकता. त्याच्या वापराने डोकेदुखी कमी होऊ शकते.
हे तेल चिंता, अँक्झायटी आणि झोप न येणे अशी लक्षणे कमी करण्यास मदत करते. तसेच यामुळे आपला मेंदू रिलॅक्स होतो. त्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते व डोकेदुखीदेखील कमी होते. मात्र गर्भवती महिलांनी या तेलाचा वापर करू नये.

रोझमेरी ऑईल

डोकेदुखीमध्ये तुम्ही रोझमेरी ऑईलनेही मसाज करू शकता. यामध्ये असलेले दाहक-विरोधी आणि वेदनाशामक गुणधर्म तणाव कमी करतात, ज्यामुळे
डोकेदुखीच्या वेदना कमी होण्यास मदत होते. या तेलाच्या वापरामुळे निद्रानाश कमी होते व स्नायूंनाही आराम मिळतो. त्याचाही डोकेदुखी कमी करण्यात फायदा होतो.
पण तुम्हाला डोकेदुखीचा खूप जास्त त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लव्हेंडर ऑईल

डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही लॅव्हेंडर तेलाने देखील मसाज करू शकता. त्यामुळे तणाव, चिंता ही लक्षणे कमी होण्यास मदत होते. मायग्रेनच्या दुखण्यापासूनही यामुळे आराम मिळतो. या तेलांचा वापर केल्याने आराम मिळतो.

मात्र सतत डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.


डोकेदुखीमुळे तुम्हीही आहात का त्रस्त ? या तेलाच्या वापराने मिळेल क्षणार्धात आराम