बातम्या

आम्लपित्ताचा त्रास आहे ? मग ‘हा’ उपाय कराच

Are you suffering from acid reflux


By nisha patil - 3/14/2024 7:07:03 AM
Share This News:



बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना पित्ताचा त्रास होतो. पोटाची ही समस्या साधी आहे पण याचे दुष्परिणाम खुपच घातक आहेत. अनेक रोगाची सुरुवात ही पित्तामुळे होते, असेही म्हटले जाते. पित्त हा एक साधा आजार असला तरी त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्रासदायक ठरू शकते. पित्ताचा त्रास हा शरीरावर खूप घातक परिणाम करणारा ठरतो. या त्रासामुळे कार्यक्षमता घटते.

पित्त कमी करण्यासाठी दररोज जेवण झाल्यानंतर आणि झोपण्याच्या एक तास आधी दुधासोबत उकळलेल्या ११ मनुका चावून खाव्यात. तसेच ज्या दुधात मनुका उकळून घेतल्या आहेत ते दूध प्यावे. सतत काही दिवस असे केल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. सकाळी उठल्यानंतर १ ते २ ग्लास कोमट पाणी प्यावे आणि फिरायला जावे, त्यामुळेही पित्त कमी होण्यास मदत होते. हे उपाय सहज सोपे असल्याने कुणालाही करता येऊ शकतात.


आम्लपित्ताचा त्रास आहे ? मग ‘हा’ उपाय कराच