बातम्या

लठ्ठपणाने त्रस्त आहात का? ‘ही’ 8 फळे आणि भाज्या वेगाने कमी करतील वजन; जाणून घ्या

Are you suffering from obesity


By nisha patil - 8/1/2024 7:36:04 AM
Share This News:



काही फळे आणि भाज्या आपली इम्युनिटी वाढवण्यासह वजन सुद्धा नियंत्रित करण्याचे काम करतात. तुम्ही सुद्धा तुमचे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आपल्या डाएटमध्ये या फळांचा आणि भाज्यांचा आहारात आवश्य समावेश करा.

कलिंगड –
कलिंगडमध्ये 92 टक्के पाणी असल्याने शरीर हायड्रेट राहते. याच्या सेवनाने लवकर भूक लागत नाही, गोड खाण्याची इच्छा कमी होते. यात व्हिटॅमिन सी, ए, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लायकोपीन असते. यामुळे वजन कमी होते.

पपई –
यात कॅल्शियम, व्हिटॅमिन, आयर्न, मिनरल्स आणि फॉस्फरस आहे. पचनशक्ती मजबूत होते. यामुळे वजन कमी होते.काकडी –
शरीर हायड्रेट राहते. कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्याने पोट भरलेले राहते, आणि वजन कमी होते.

 

आंबा –
आंबा खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. यामध्ये बायोअ‍ॅक्टिव यौगिक आणि फायटोकेमिकल्स असतात जे फॅटच्या पेशी दाबतात. वजन कमी करण्यासाठी बिनधास्त आंबा खा.

दुधी भोपळा –
यात भरपूर पाणी असल्याने शरीर हायड्रेट राहते. फॅट अजिबात नाही. वजन कमी करते.

सिमला मिरची –
सिमला मिरचीमधील फायटोकेमिकल्स वजन कंट्रोल करण्यात मदत करतात.

पालक –
पोटाची चरबी कमी करण्यासाठी पालक खुप उपयोगी आहे. यामध्ये फायबर आणि पोषकतत्व भरपूर असतात. पालक व्हिटॅमिन ए, सी, डी, मॅग्नेशियम, आयर्न आणि मँगेनीज भरपूर असते. फॅट कमी करण्यासाठी आपल्या ब्रेकफास्ट किंवा लंचमध्ये पालकाचा समावेश आवश्यक करावा. भाजी शिवाय पालक सलाडमध्ये टाकूनही खावू शकता.

बीट –
बीटमध्ये कॅलरी खुप कमी असते. यात फायबर भरपूर असते, ज्यामुळे तुम्हाला मोठ्या कालावधीपर्यंत भूक लागत नाही. बीटचा ज्यूस हाय ब्लड प्रेशर कमी करण्यात मदत करतो. यामध्ये फॅट अजिबात नसते, ज्यामुळे हे वजन वाढू देत नाही. सकाळी बीटचा ज्यूस प्यायल्याने दिवसभर तुम्ही अ‍ॅक्टिव्ह राहता. याच्या सेवनाने थकवा, कमजोरी आणि मांसपेशीमध्ये वेदनांची समस्या दूर होते


लठ्ठपणाने त्रस्त आहात का? ‘ही’ 8 फळे आणि भाज्या वेगाने कमी करतील वजन; जाणून घ्या