बातम्या

सकाळी उठताच सुजतात डोळे ? जडपणाही जाणवतो ? हे असू शकते कारण.

Are your eyes swollen when you wake up in the morning


By nisha patil - 8/25/2023 7:43:44 AM
Share This News:



झोपेतून उठल्याबरोबर डोळे जड होणे किंवा ते सुजल्यासारखे वाटणे, याचा तुम्हाला कधी अनुभव आला आहे का ? असे वाटणारे तुम्ही काही एकटेच नाही. बऱ्याच लोकांना हा त्रास जाणवतो, पण त्यामागचं कारण माहीत नसतं.

सकाळी उठल्यावर डोळे जड किंवा सुजल्यासारखे का वाटतात, त्या मागचे कारण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

का सुजतात डोळे ?

– अनेक वेळा ॲलर्जीक रिॲक्शनमुळे डोळ्यांच्या सभोवतालच्या रक्तवाहिन्या पसरतात आणि फुगतात. याशिवाय ऋतूमानानुसार होणारी ॲलर्जी किंवा स्किन केअर प्रोडक्ट्स यामुळेही हा त्रास होऊ शकतो.

– सर्दी किंवा ॲलर्जीमुळे सायनसची समस्या वाढते तेव्हा डोळ्यांभोवतीच्या रक्तवाहिन्या फुगू शकतात.

– वय वाढल्यानंतर डोळ्यांभोवतीची त्वचा पातळ होते, ज्यामुळे तिची लवचिकता देखील कमी होते. यामुळे डोळ्यांभोवती जमा झालेली चरबी निघून जाते आणि परिणामी सूज येते.

– तुम्ही किती वेळ झोपता यासोबतच झोपेची गुणवत्ता देखील महत्त्वाची असते. झोप चांगली झाली नाही तरी डोळ्यांखाली सूज येऊ शकते किंवा झोपेतून उठल्यानंतर डोळे जड होऊ शकतात.

– जर तुम्ही जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केले तर त्यामुळे शरीरात पाणी साठून राहते, ज्यामुळे डोळ्यांभोवती सूज येऊ शकते.

डोळ्यांभोवतीची सूज कशी कमी करावी ?

– डोळ्यांसाठी काकडीचा वापर हा बेस्ट ठरतो. काकडीच्या स्लाइसमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात आणि त्याचा शीतल प्रभाव जळजळ कमी करण्यास मदत करतो. डोळे बंद करून त्यावर 10-15 मिनिटे थंड काकडीचे तुकडे ठेवा. यामुळे आराम मिळेल.

– चहामधील कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांना पसरण्यापासून रोखण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे तु्म्ही डोळ्यांसाठी टी बॅग्सचा वापर करू शकता.

– बर्फाने शेकल्यामुळेही डोळ्यांना आराम मिळतो व सूज कमी होते.

– बटाट्यामध्ये एन्झाईम्स आणि स्टार्च असतात, ज्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. बटाट्याचे पातळ तुकडे डोळ्यांवर 10 मिनिटे ठेवल्यानेही आराम मिळू शकतो.

– कापूस गार दुधात बुडवून तो डोळ्यांवर ठेवल्यानेही आराम मिळतो. यामुळे त्वचा हायड्रेटही होते.


सकाळी उठताच सुजतात डोळे ? जडपणाही जाणवतो ? हे असू शकते कारण.