बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये भारत राखीव बटालियन मार्फत शस्त्र प्रदर्शन
By nisha patil - 8/13/2024 7:29:22 PM
Share This News:
विद्यार्थी दशेत असताना सशस्त्र निमशस्त्र आणि संरक्षण दल याविषयी असलेली आवड ही भविष्यकालीन देश संरक्षणासाठीच्या संधीत रूपांतरित होते .विद्यार्थ्यांनी संरक्षण दलाविषयी असलेली संपूर्ण माहिती घेऊन भविष्यकालीन वाटचालीसाठीचा राजमार्ग तयार करण्याच्या प्रेरणेने समादेशक नम्रता पाटील यांनी शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन विवेकानंद महाविद्यालयात केले .
भारत राखीव बटालियन कोल्हापूर -३ एस आर पी एफ गट क्रमांक १६ मार्फत आयोजित शस्त्र प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी प्रसंगी सहाय्यक समादेशक सदांशिव व सहाय्यक समादेशक हिंगरूपे यांनी या प्रदर्शनासाठीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले विवेकानंद महाविद्यालय हे एक पारंपरिक महाविद्यालयातील देशाला सर्वात जास्त संरक्षण दलासाठी अधिकारी देणारे महाविद्यालय आहे आणि त्याचा वारसा हा अशा प्रकारच्या कार्यक्रमातूनच पुढे नेला जातो. असे मत अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आर आर कुंभार यांनी मांडले सदरच्या कार्यक्रमासाठी भारत राखीव बटालियन कोल्हापूर 3 चे पीएसआय अशोक गुजर आणि वेपन इन्स्ट्रक्टर कैलास जोनवाल श्री लाखे श्री कोळी श्री बडे श्री शिंदे श्री बेंबडे श्री जगताप यांनी शस्त्रांची वैज्ञानिक आणि तांत्रिक माहिती दिली .
सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन आय क्यू ए सी प्रमुख डॉ श्रुती जोशी एनसीसी विभागप्रमुख कॅप्टन सुनीता भोसले कार्यालयीन अधीक्षक श्री रघुनाथ जोग ज्यूनियर सायन्स विभाग प्रमुख प्रा मुकुंद नवले स्टाफ सेक्रेटरी प्रा विश्वंभर कुलकर्णी प्रा किशोर गुजर कर्नल मानस दीक्षित कर्नल सुहास काळे सुभेदार मेजर सुरेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले .कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक लेफ्टनंट जे आर भरमगोंडा यांनी केले तर आभार जिमखाना विभाग प्रमुख डॉ विकास जाधव यांनी मानले सदरच्या कार्यक्रमासाठी एनसीसी विभागाचे छात्र आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीं उपस्थित होते
विवेकानंद कॉलेजमध्ये भारत राखीव बटालियन मार्फत शस्त्र प्रदर्शन
|