बातम्या

सैन्य दलातील पतिला पत्नीकडून विष पाजून मारण्याचा प्रयत्न.

Army husband attempted to be poisoned by his wife


By nisha patil - 7/20/2024 2:23:40 PM
Share This News:



गडहिंगलज येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानाची पत्नी व तिच्या साथीदाराकडून विष पाजून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.
अमर भिंमगोंडा पाटील अस जवानाचे आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी तेजस्विनी अमर देसाई हिला काल शुक्रवारी गडहिंग्लज पोलिसांनी अटक केलीय. तर तिचा साथीदार फरार आहे.

अमर हे तीन जुलैला सुट्टीवर आले होते.१८ जुलै गुरुवारी रात्री त्यांची पत्नी तेजस्वीनी हिने आपल्या साथीदाराच्या मदतीने पतीचे डोळे आणि हात पाय बांधून विष पाजुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आरडा ओरड केल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली. व त्यांची सुटका केली.अमरला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं असता प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या प्रकरणी अमर यांच्या फिर्यादीवरून तेजस्विनी व तिच्या साथीदारावर गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झालाय.काल तिला पोलिसांनी अटक केलीय.

या घटनेचा अधिक तपास सहा.पोलिस निरीक्षक निशानकर हे करीत आहेत.


सैन्य दलातील पतिला पत्नीकडून विष पाजून मारण्याचा प्रयत्न.