बातम्या
संपूर्ण देशभरात सुमारे चार लाख सरकारी कर्मचारी रामलीला मैदानावर
By nisha patil - 3/10/2023 4:03:35 PM
Share This News:
देशातील पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू आहे ती संपूर्ण देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना लागु करण्याची मागणी साठी संपूर्ण देशभराततुन सुमारे चार लाख सरकारी कर्मचारी रामलीला मैदानावर जमले होते
नोव्हेंबर 2005 पासून देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद करून नवीन पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती.त्याच्या विरोधात संपूर्ण देशभरातुन सुमारे चार लाख सरकारी कर्मचारी रामलीला मैदानावर जमले होते.सध्या देशातील पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना त्या त्या राज्य सरकारने लागू केली आहे. परंतु ही योजना संपूर्ण देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना लागु करावी या एकाच मागणीसाठी जुनी पेन्शन शंखनाद आंदोलन रामलीला मैदानावर करण्यात आले.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातून सरकारी कर्मचारी आंदोलनाला सहभागी झाले होते. जुनी पेन्शन हक्क संघटनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, संतोष जुगळे,शिक्षक बँक संचालक अमर वरुटे,तौसिफ पटेल यांच्यासह या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जुने पेन्शन योजनेतील .शिक्षक बँकचे ,चेअरमन सुनील एडके ,संचालक शिक्षक बँक कोल्हापूर ,.शिवाजी रोडे पाटील ,.सदाभाऊ कांबळे, .संजय जगताप,अर्जुन जानकर , ,तसेच जिल्ह्यातील अनेक एनपीएस धारक शिक्षक उपस्थित होते.
संपूर्ण देशभरात सुमारे चार लाख सरकारी कर्मचारी रामलीला मैदानावर
|