बातम्या

अतिशय क्षेत्र बाहुबली येथे श्रवण बेलगोलाचे चारुकीर्ती भट्टारक स्वामी यांचे आगमन.

Arrival of Charukirti Bhattarak Swami of Shravan Belgola in very area Baahubali


By nisha patil - 10/18/2024 4:40:57 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे श्रवणबेळगोळाचे चारुकीर्ती भट्टारक स्वामी यांचे आज सायंकाळी आगमन झाले. बाहुबलीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महिलांनी स्वामीजींचे पादपूजन केले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैन  श्रावक-श्राविका उपस्थित होते. 
       

त्यानंतर बाहुबली ब्रह्मचर्याश्रम बाहुबली व बाहुबली विद्यापीठ बाहुबलीचे संचालक गोमटेश बेडगे यांनी स्वामीजींचे स्वागत केले. यामध्ये एम. जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबलीचे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई यांनी परमपूज्य गुरुदेव १०८ समंतभद्र महाराज व त्यांनी स्थापन केलेल्या गुरुकुलांची माहिती  सविस्तर दिली. तसेच बाहुबली क्षेत्राची माहिती व इतिहास स्वामीजींना दिली.
यामध्ये शाळेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे,तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले हे उपस्थित होते.


अतिशय क्षेत्र बाहुबली येथे श्रवण बेलगोलाचे चारुकीर्ती भट्टारक स्वामी यांचे आगमन.