स्वाभिमानी शेतकरी संघटने तर्फे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार
By nisha patil - 5/26/2023 9:42:40 PM
Share This News:
कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापुर गोकुळ च्या चेअरमनपदी अरुण डोंगळे यांची बिनविरोध निवड झालेबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी चेअरमन डोंगळे यांना स्वतः कोल्हापुरी फेटा बांधून आपुलकीचा सत्कार केला यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ जालिंदर पाटील ,भगवान काटे व इतर मान्यवर होते यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की सामान्य दूध उत्पादकाशी नाळ असणारे नेतृत्व म्हणजे अरुणकुमार डोंगळे असे गौरव उद्गार काढले व त्यांच्या कामाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा स्वतः कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार मा. राजू शेट्टी उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटने तर्फे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कारspeednewslive24#
|