बातम्या
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता
By nisha patil - 4/1/2024 7:39:17 PM
Share This News:
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता
नव्वी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला गेला आहे. कार्यालयीन स्टाफलाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाणारे सगळे रस्ते बंद करण्यात आले आहेत. कालच आपने केजरीवाल यांना अटक करण्याचे षडयंत्र असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता केजरीवाल यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी 3 वेळा समन्स देवूनही केजरीवाल ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे आता त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
आज काय घडणार?
आज सकाळपासूनच केजरीवाल यांना अटक होणार असल्याची चर्चा होतेय. तशा बातम्या येत आहेत. मात्र या प्रकरणी आता अपडेट आली आहे. ईडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. केजरीवाल यांच्या घरावर आज छापेमारी होणार नाही. तर पुन्हा एकदा म्हणजेच चौथ्यांदा अरविंद केजरीवाल यांना समन्स देण्यात येणार आहे. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणी ईडी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची शक्यता आहे.
मद्यघोटाळा काय आहे?
2021-2022 या वर्षात दिल्लीत नवं मद्यधोरण लागू झालं. नव्या मद्यधोरणामुळे मद्य व्यावसायाला खासगी लोकांकडे देण्यात आलं. हे नवं धोरण डीलर्सना फायदा करून देण्यासाठी आणण्यात आलं असल्याचा आरोप दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारवर लावण्यात आला. उपराज्यपालांनी मुख्य सचिवांना याबाबतचा अहवाल मागितला. या रिपोर्टमध्ये गडबड असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला.
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता
|