बातम्या

अखिल भारतीय सर्जन संघटनेच्या (ASI) सचिव पदी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची सलग तिसऱ्यांदा निवड

As Secretary of All India Association of Surgeons ASI Dr Pratap Singh Varute elected for the third time in a row


By nisha patil - 12/16/2023 11:12:07 PM
Share This News:



अखिल भारतीय सर्जन संघटनेच्या (ASI) सचिव पदी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची सलग तिसऱ्यांदा निवड 

असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया या भारतातील शल्य चिकित्सकांच्या शिखर संघटनेच्या सचिव पदी कोल्हापूर सर्जिकल सोसायटी चे ऍडव्हाजरी मेंबर व डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची सलग तिसऱ्यांदा (वर्ष २०२४ साठी) निवड झाली आहे. 
 महाराष्ट्रातून सचिव पदी निवड होणारे ते पहिलेच सर्जन आहेत. 

मागील १३ वर्षांमध्ये त्यांनी सर्जरीच्या विविध विषयावरील अनेक परिसंवाद कार्यशाळा, थेट शस्त्रक्रिया प्रक्षेपण कार्यशाळा, वैद्यकीय शिक्षणाच्या परिषदा, अखिल महाराष्ट्र शल्यचिकित्सकांची वार्षिक परिषद २०१६,  यासह कोविड काळ असूनसुद्धा २० पेक्षा जास्त ऑनलाईन प्लँटफॉर्म वर अखिल भारतीय शल्यचिकित्सकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या. याचीच पोचपावती म्हणून भारतीय शल्यचिकित्सकांनी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची महाराष्ट्रातून या पदी निवड केली. 

डी. वाय. पाटील  एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश मुदगल,कुलसचिव डॉ.  व्ही. व्ही. भोसले,  अधिष्ठाता डॉ. राकेश शर्मा, उपकुलसचिव डॉ. संजय जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डिपार्टमेंट ऑफ सर्जरीचे विभाग प्रमुख डॉ. शीतल मुरचीटे व त्यांचे सहकारी, तसेच कोल्हापूर सर्जिकल सोसायटी चे अध्यक्ष डॉ. देवेंद्र होशिंग, सचिव डॉ. मानसिंग आडनाईक, खजानीस डॉ. सागर कुरुणकर व सर्व संचालक मंडळ तसेच कोल्हापूर सर्जिकल सोसायटी व महाराष्ट्र सर्जिकल सोसायटी चे सर्व सभासद तसेच डॉ. आप्पासाहेब मेमोरियल हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सौ. वसुंधरा वरूटे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.


अखिल भारतीय सर्जन संघटनेच्या (ASI) सचिव पदी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची सलग तिसऱ्यांदा निवड