बातम्या
चौदाव्या विधानसभा कार्यकाळात तब्बल १ हजार २९ तास १८ मिनिटे कामकाज
By nisha patil - 7/13/2024 12:14:39 PM
Share This News:
चौदाव्या विधानसभेच्या कार्यकाळात तब्बल १ हजार २९ तास १८ मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ७ तास ३४ मिनिटे झाले. तर एकूण बैठकांची संख्या १३६ आहे.या विधानसभेच्या कार्यकाळात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९६.६५ टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ८२.६७ टक्के इतकी होती.
विधानसभेत पुर्न:स्थापित १९७ शासकीय विधेयके मांडण्यात आली त्यापैकी १८३ विधेयके संमत झाली. तसेच सभागृहात नियम २९३ अन्वये एकूण २८ सूचनांवर चर्चा झाली. १४ वी विधानसभा दि. २५ ऑक्टोबर २०१९ रोजी गठित झाली. तर सभागृहाची पहिली बैठक दि. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी घेण्यात आली.
चौदाव्या विधानसभा कार्यकाळात तब्बल १ हजार २९ तास १८ मिनिटे कामकाज
|