बातम्या
सरत्या वर्षात टीम इंडियाकडून तब्बल16 जणांचे पदार्पण
By nisha patil - 12/28/2023 6:14:30 PM
Share This News:
सरत्या वर्षात टीम इंडियाकडून तब्बल16 जणांचे पदार्पण
भारतीय क्रिकेट संघाच्या बेंच स्ट्रेंथबद्दल नेहमीच चर्चा होत असते. एका वर्षात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंची संख्या मोजल्यानंतर टीम इंडियाची बेंच स्ट्रेंथ किती मजबूत आहे याचा अंदाज लावता येतो. सरत्या वर्षात 2023 मध्ये, 2 किंवा 4 नव्हे तर तब्बल 16 खेळाडूंनी भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी पदार्पण केले आहे. टीम इंडियाच्या 16 नवीन खेळाडूंनी क्रिकेटच्या वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे, परंतु तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा एकच खेळाडू आहे. बिहारचा मुकेश कुमार हा एकमेव खेळाडू आहे ज्याने 2023 मध्ये T20, ODI आणि कसोटी या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले
टीम इंडियासाठी 2023 मध्ये एकूण 11 खेळाडूंनी T20 फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे. यामध्ये शुभमन गिल, तिलक वर्मा, राहुल त्रिपाठी, शिवम मावी, शाहबाज अहमद, आर साई किशोर, प्रसिद्ध कृष्णा, जितेश शर्मा, मुकेश कुमार, जशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंह यांच्या नावांचा समावेश आहे
2023 मध्ये टीम इंडियासाठी एकदिवसीय फॉर्मेटमध्ये पदार्पण करणार्या एकूण खेळाडूंची संख्या पाच आहे. या खेळाडूंमध्ये मुकेश कुमार, रजत पाटीदार, आर साई किशोर, रिंकू सिंह आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे.
2023 मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी एकूण 6 खेळाडूंनी पदार्पण केले आहे. यामध्ये केएस भरत, सूर्यकुमार यादव, इशान किशन, यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार आणि प्रसिध कृष्णा यांच्या नावांचा समावेश आहे. सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात प्रसिध कृष्णाने पदार्पण केले.
अशाप्रकारे 2023 हे वर्ष भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी अविस्मरणीय ठरले आहे. यावर्षी टीम इंडियाच्या एकूण 16 नवीन खेळाडूंनी क्रिकेटच्या कोणत्या ना कोणत्या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे. आता या 16 खेळाडूंपैकी किती खेळाडू पुढील 10-15 किंवा 20 वर्षे क्रिकेट खेळू शकतील हे पाहायचे आहे. मात्र, या सर्व खेळाडूंमध्ये टीम इंडियाचे भविष्य सांभाळण्याची क्षमता आहे, मात्र या सर्व खेळाडूंची आतापर्यंतची कामगिरी पाहता शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, यशस्वी जैस्वाल आणि मुकेश कुमार हे काही खेळाडू आहेत जे पुढील अनेक वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळू शकतात.
सरत्या वर्षात टीम इंडियाकडून तब्बल16 जणांचे पदार्पण
|