बातम्या

राज्यात तब्बल अडीच लाख नोकऱ्या रिक्त, अडीच महिन्यापासून एकही पद भरले नाही

As many as two and a half lakh jobs are vacant in the state


By nisha patil - 7/20/2023 6:35:44 PM
Share This News:



राज्यात तब्बल अडीच लाख नोकऱ्या रिक्त, अडीच महिन्यापासून एकही पद भरले नाही

महाराष्ट्र राज्यात विविध विभागात आणि जिल्हापरिषदमध्ये दोन लाख 40 हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे समोर आलेय. मागील 30 महिन्यापासून एकही रिक्त पद भरले गेलेले नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यातील रिक्त पदासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडे माहिती मागितली होती. यामध्ये 2.40 लाख पदे रिक्त असल्याचे समोर आलेय.महाराष्ट्र राज्यातील विविध विभाग आणि जिल्हा परिषदअंतर्गत 2.44 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. शासकीय विभाग व जिल्हा परिषदेतील 31 डिसेंबर, 2020 पर्यंतची माहिती उपलब्ध करून दिली. एकूण 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद यात मंजूर पदांची संख्या10 लाख 70 हजार 840 इतकी आहे. यापैकी 8 लाख 26 हजार 435 ही पदे भरलेली आहेत. तर 2 लाख 44 हजार 405 इतकी पदे रिक्त असल्याचे समोर आलेय. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्य सरकारकडे 14 जून 2023 रोजी अर्ज सादर करत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व वर्गातील एकूण पदांची माहिती, मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहिती मागितली होती. सामान्य प्रशासन विभागाने अनिल गलगली यांना गटनिहाय शासकीय व जिल्हा परिषदेतील गट अ, ब, क आणि ड मधील दिनांक 31 डिसेंबर 2020 यापर्यंतची माहिती उपलब्ध करुन दिली. एकूण 29 शासकीय विभाग आणि जिल्हापरिषद यात मंजूर पदांची संख्या 10, 70,840 इतकी आहे. ज्यापैकी 8,26,435 ही पदे भरलेली आहेत. तर 2,44,405 ही पदे रिक्त आहेत. यात शासकीय कर्मचाऱ्यांची 192425 तर जिल्हापरिषदेच्या 51980 अशी एकूण 244405 पदे रिक्त आहेत.


राज्यात तब्बल अडीच लाख नोकऱ्या रिक्त, अडीच महिन्यापासून एकही पद भरले नाही