बातम्या

लोकसभा निकाल लागताच महाराष्ट्रात पुन्हा रणधुमाळी

As soon as the Lok Sabha results are announced


By nisha patil - 8/5/2024 5:45:50 PM
Share This News:



लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आणि जनतेमध्ये निकालाची उत्सुकता लागून राहिले लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला की लगेचच विधानपरिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत आहे.  पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागाचं 10 जूनला मतदान होतंय. मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालीय. चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपतोय.  
 

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे.  विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी 7 सदस्य शिक्षक, तर 7 सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. दरम्यान दोन पदवीधर आणि  दोन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार 10 जूनला मतदान होणार असून  13जूनला मतमोजणी होईल.


लोकसभा निकाल लागताच महाराष्ट्रात पुन्हा रणधुमाळी